पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी ओकली गरळ

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नात्यात तणाव कमी होत नसतानाच शेजारी राष्ट्राच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरळ ओकली.

एका जाहीर सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना भुट्टो यांनी सिंधू जल कारारासंदर्भात भाष्य करत भारताला थेट इशारा दिला. ‘मी सिंधू नदीच्या काठावर उभा राहून भारताला स्पष्टपणे सांगतोय की, सिंधू (नदी) आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर मग इथं आमच्याच रक्ताचे पाट वाहतील…’, असं भुट्टो म्हणाले.

बिलावल भुट्टो जरदारी यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. पाक नेते भुट्टो यांनी भारतानं सिंधूवर हल्ला केल्याचं म्हणत देशाला हल्लेखोर म्हटलं. भारताची लोकसंख्या आमच्याहून जास्त असेल मात्र पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानातही लढा देऊ, असं सांगत आमचा आवाजच भारताला सडेतोड उत्तर देईल याचाच पुनरुच्चार त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here