बिडीडी पुर्नविकास प्रकल्पातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, म्हाडाकडून मोठी अपडेट!

मुंबईतील बीडीडीवासियांचे लक्ष पुर्नविकास प्रकल्पाकडे लागून राहीले आहेत. त्यातील काही घरे आता तयार आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाने अत्यंत महत्वाची अपडेट दिली आहे. पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना कधी चाव्या मिळणार? तसेच मुंबईतील इतर पुनर्विकास प्रकल्प कुठपर्यंत आलेयत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मुख्यमंत्री वॉर रुमच्या धर्तीवर आम्ही प्रोजेक्ट मॉनिटरिंग करणार आहोत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारेदेखील म्हाडा प्रशासन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. म्हाडा कार्यालयात आपण आता ऑफिस नेव्हिगेटर आपण लावलेले आहेत. ज्याद्वारे कोणतं ऑफीस कुठे आहे? हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. 100 दिवस मिशन प्रोग्रामची तयारी पूर्ण झाली असून २ मे पर्यंत आपण सबमिशन करुन माहिती वेबसाईटवर पब्लिश केली जाणार आहे.

नायगाव, एनएम जोशी आणि वरळी बीडीडीची कामं जलदगतीने सुरु आहेत. मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, जीटीबी नगर, पत्राचाळ पुनर्विकास करणे असे काही निर्णय झाले आहेत. बीडीडी पुर्नविकास प्रकल्पातील काही घरं तयार आहेत. काही तांत्रिक अडचण आल्या पण यासंदर्भात प्रश्न सुटला, असे जयस्वाल म्हणाले. पुढील आठवड्यात ओसी देखील मिळेल. लॉटरी देखील झाली आहे. तयार घरांसाठी १५ मे पर्यंत चावी वाटपासंदर्भात आपण कार्यक्रम करणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here