इस्त्रायलच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी देशाच्या लष्कर प्रमुखपदी इयाल जमीर यांची नियुक्ती केली आहे. 6 मार्च रोजी ते पदभार स्वीकारतील. ते आयडीएफचे 24 वे जनरल बनले आहेत, अशी माहिती इस्त्रायली पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून दिली आहे.

हमासचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरल्यानंतर मागील महिन्यात लष्करप्रमुख हलेवी यांनी राजीनामा दिला होता. हलेवी यांनी जमीर यांचे अभिनंदन केलं आहे. मी जमीर यांना अनेक वर्षांपासून ओळखतो आणि मला खात्री आहे की ते पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी नेतृत्व करतील. मी त्यांना शुभेच्छा देतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here