एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा वाढला आहे. उन्हाच्या काहिलीमुळं उष्माघात, उन्हाळी लागणे यासारखे आजार पाठी लागत आहेत. अशातच वाढत्या तापमानामुळं नेत्रसंसर्गाचा धोकादेखील वाढतो आहे. डॉक्टरांनी नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.
वाढत्या तापमानामुळं डिहायड्रेशन, उलट्या, जुलाब आणि त्वचाविकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. येत्या काही दिवसांत तापमान आणखी वाढणार आहे. उन्हाचा चटका वाढल्यामुळं डोळ्यातील बुब्बुळ कोरडे होऊन संसर्ग होण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उन्हात जाताना डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. उन्हात बाहेर पडताना चष्मा, गॉगल किंवा टोपी घालून घराबाहेर पडावे, असं अवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.