सचिन तेंडुलकरने वैभव सूर्यवंशीचं केलं कौतुक पण एक्सनं अकाउंटच सस्पेंड केलं

राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने गुजरातविरोधातील सामन्यात ३५ चेंडूत शतक ठोकल्यानंतर सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. यासह वयाच्या १४ व्या वर्षी शतक ठोकणारा आणि तेही इतक्या कमी चेंडूत करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. गुजरातच्या पराभवानंतर सोशल मीडियासह सगळीकडे वैभव सूर्यवंशीची चर्चा आहे. एक्सवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पोस्ट शेअर करत वैभव सूर्यवंशीच्या खेळीचं कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलकरच्या या पोस्टला वैभवने उत्तरही दिलं. मात्र त्याच्या एक्स अकाऊंटवर कारवाई करण्यात आली असून, ते बंद करण्यात आलं आहे. कारण हे अकाऊंट त्याचं नाव नसून बनावट आहे.

सोमवारी वैभव सूर्यवंशीच्या चांगल्या कामगिरीचा फायदा घेत वैभव सूर्यवंशीच्या नावे असणाऱ्या एका प्रोफाइलने @VaibhavOfficia या हँडलचा वापर केला. ज्यामुळे फॉलोअर्स आणि सहभाग प्रचंड वाढला. प्रोफाइलने डिस्प्ले पिक्चरमध्ये वैभवचा राजस्थानच्या जर्सीमधील फोटो वापरला. तर कव्हर फोटो इंडिया U19 व्हाइट्समधील वैभवचा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here