पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मयत पर्यटकांच्या नातेवाईकांना दिलासा देणारा मोठा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या ६ मृतांच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत केली जाणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पहलगाममधील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्रातील ६ मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय या कुटुंबांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.
जगदाळे कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांनी विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला आहे.