भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सिंधू नदीचं पाणी रोखलं असून, हवाई क्षेत्रही त्यांच्या विमानांसाठी बंद केलं आहे. दरम्यान दोन्ही देशातील राजकीय नेते यावरुन एकमेकांना इशारा देत आहेत. पाकिस्तान पिपल्स पार्टीचा (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टा याने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात भाष्य केलं आहे.
पहलगाम हल्ल्यासंदर्भात खोटे आरोप करुन, पाकिस्तानचं पाणी रोखण्यात आल्याचा आरोप बिलावल भुट्टोने केला आहे. पण आम्ही असं होऊ देणार नाही असा इशाराही त्याने दिला आहे. बिलावलने भारताला युद्धाची धमकी देत म्हटलं आहे की, “पाकिस्तानविरोधात पुरावे द्या, अन्यथा आरोप करणं बंद करा. जर भारताने एकतर्फीपणे सिंधू करार तोडण्यासाठी पुढाकार घेतला तर नदीत रक्त वाहील”.
पाकिस्तानचा माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टोने गुरुवारी सिंध प्रांतातील मिरपूर खास येथे एका कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. बिलावलने नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘गुजरात का कसाई नरेंद्र मोदी’ असा केला. सिंधू नदीला गुजरातच्या कसाईच्या हाती मरु देणार नाही असं त्याने म्हटलं.