सोमवारी ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा हा निकाल असून दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी बोर्डाच्या संकेतस्थळावर रिझल्ट पाहू शकतील.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडाळामार्फत हा निकाल जाहीर होईल.
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील. त्यानंतर विद्यार्थी या माहिती प्रिंटदेखील काढू शकतात. तसंच, डिजीलॉकर अॅपमध्ये डिजीटल रिझल्ट संग्रहीत करुन ठेवण्याची सोयदेखील उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.