शरद केळकरनं ‘तुम से तुम तक’ या मालिकेतून तब्बल ८ वर्षांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. या शोसाठी त्यानं जितकं मानधन घेतलं आहे. त्यामुळे तो छोट्या पडद्यावरील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. ‘डीएनए’ च्या रिपोर्ट्सनुसार, शरद केळकरला या शोसाठी रोज ३.५० लाख रुपये मानधन मिळणार आहे. जर मालिकेचं शूटिंग महिन्याच्या ३० दिवस होत असेल तर त्या हिशोबानं शरद एका महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम कमावतोय.
शरद केळकरच्या या मालिकेविषयी बोलायचं झालं तर त्याची ‘तुम से तुम तक’ ही सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE5 वर पाहू शकता. यात शरद केळकरसोबत महत्त्वाच्या भूमिकेत निहारिका चौकसे आहे. ही मालिका २८ एप्रिलपासून सुरु झाली आहे.