अलीकडेच सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशातंर्गंत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आजही मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं महागलं आहे. आज जवळपास १ टक्क्यांपर्यंत सोनं वधारलं आहे. गेल्या महिन्यात सोन्यात जवळपास ७ टक्क्यांपर्यंत तेजी नोंदवली होती. यामुळं गुतंवणुकदारांसमोर चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात मजबुती दिसत असल्याचे पाहायला मिळते.
कॉमेक्सवर सोनं $3,280 प्रति औंसवर पोहोचले आहे. ज्यामुळं आज $21 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चीन आणि अमेरिके यांच्यातील राजकीय तणाव आणि अमेरिकेत व्याज दरातील अनिश्चित्ता आहे. फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता असल्याने गुंतवणुकदरात चिंता वाढली आहे. त्यामुळं सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. आज सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली असून २४ कॅरेट सोनं प्रतितोळा ८७,७५० रुपयांवर पोहोचलं आहे. तर, २२ कॅरेट सोन्यात २२० रुपयांची वाढ झाली असून ९५,७३० रुपये प्रतितोळा इतकी सोन्याची किंमत आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरातही चढ-उतार होताना दिसत आहे. MCX वर चांदीचा भाव 93,000 प्रति किलोच्या आसपास आहे. यात देशांतर्गंत बाजारात हलकी घट झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीच्या किंमतीत जवळपास 0.5 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली होती. कॉमेक्सवर चांदी $33 प्रति औंसच्या जवळपास पोहोचली आहे.