भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानींची घाबरगुंडी उडाली असून पाकिस्तानी नागरिक सरकारला दोष देत असताना दिसत आहे. असाच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक पाकिस्तानी त्यांच्या सरकारला खडेबोल सुनावताना दिसत आहे. भारताचे हल्ले किती अचूक होते याबाबतही त्याने आठवणीने सांगितल्या आहेत. भारताचे हल्ले रोखण्यात पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली असल्याचं सांगताना सरकारला आत्मपरीक्षणाचा सल्ला त्यानं दिला आहे.
या व्हिडीओत पाकिस्तानी नागरिक हा बोलताना दिसतोय की “काल रात्री भारतानं पाकिस्तानवर 24 मिसाइल हल्ले केले आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळे मिसाईल हे टार्गेटच्या ठिकाणी लागले. भारतानं जे टार्गेट सेट केले होते, ते टार्गेट मिळवण्यात भारता यशस्वी ठरला आहे. त्याहुन आश्चर्याची गोष्ट म्हणजे की पाकिस्तानचं डिफेन्स हे एकाही मिसाइलला थांबवू शकले नाही. सगळे 24 च्या 24 हल्ले थांबवण्यात आपण अपयशी ठरलो. भारताला जे हवं होतं हे भारतानं मिळवलं आहे. ते म्हणतात ना भारताला आत घुसून मारायचं होतं. भारतानं खरंच तसं केलं आहे. तरी आपण त्यांच्या मिसाइलला थांबवू शकलो नाही. हे सत्य आहे. आता हे बघून तुम्ही हे बोलू नका की तुम्ही भारताची स्तुती करत आहात. जे सत्य आहे ते आहे.