छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ ही मालिका फेम रुपाली गांगुलीनं सोशल मीडियावर पाकिस्तान विरोधात समोर येऊन तिचं मत मांडलं आहे. तिनं सध्याच्या X अर्थात आधीच्या ट्विटर अकाऊंटवरून पाकिस्तान विरोधात तिचं स्पष्ट मत मांडलं आहे.
पोस्ट शेअर करत रुपाली गांगुलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारनं पाकिस्तानी स्ट्रीमिंग कंटेन्टवर बॅन लावण्याच्या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तर ती म्हणाली की पाक स्ट्रीमिंग कंटेन्टवर बॅन लावल्यानं मोदी सरकारला सलाम. या तनावपूर्ण परिस्थितीत आपल्या डिजिटल सीमांचे रक्षण करायलाच हवे. त्यासोबत तिनं आणखी ‘एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यात ती म्हणाली की खूप झालं, मोदी जी आता त्यांना पूर्णपणे संपवून टाका.