रविवारी मेगाब्लॉक मुंबईकरांचे हाल

मुंबईकरांचा रविवारच्या दिवशी खोळंबा होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यात येणार असल्याने रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांचा लोकल प्रवास अडचणीचा होऊ शकतो. प्रवाशांनी प्रवासापूर्वी लोकलचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं अवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

माटुंगा -मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत, तर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी १०.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत ब्लॉक आहे. सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. या लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील.

तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळविल्या जातील. ठाणे येथून सकाळी ११:०३ ते दुपारी ३:३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळविल्या जातील. या लोकल माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर वळविल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने धावतील. सीएसएमटी येथून सकाळी ९:४८ ते सायंकाळी ४.०८ पर्यंत पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकल आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९:५३ ते सायंकाळी ४:१० पर्यंत अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी व पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

१ पश्चिम रेल्वेवर शनिवार- रविवारच्या मध्यरात्री १ ते ४:३० वाजण्याच्या दरम्यान माहीम जंक्शन आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग सिस्टीम आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत मुंबई सेंट्रल 3 आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व डाऊन स्लो मार्गावरील गाड्या डाऊन फास्ट मार्गावर चालवल्या जातील. प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या मार्गावरील गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच लोअर परळ, माहीम आणि खार रोड स्थानकांवर दोन वेळा थांबतील. अप स्लो मार्गावरील माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर गाड्या थांबणार नसून खार रोड स्थानकावर दोन वेळा थांबतील. ब्लॉकमुळे, काही अप, डाऊन उपनगरीय गाड्या रद्द होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here