काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय, वादग्रस्त विधनांसाठी प्रसिद्ध असलेले सॅम पित्रोदा यांनी भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या स्थलांतरितांबद्दल एक वक्तव्य केलंय आणि त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांचे समर्थन केले असून ते गरीब बांगलादेशी कष्ट करून पैसे कमवायला भारतात येतात त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करू नये. त्यांच्या म्हणण्यानुसार ते बिचारे इथे कामाला येतात त्यांना काम करू दिलं पाहिजे.. जरी ते गैरमार्गाने असेल तरी त्यांना भारतात येऊ दिले पाहिजे. गरीब आणि भुकेल्या स्थलांतरितांना त्रास देण्यापेक्षा ग्लोबल वॉर्मिंगसारख्या मुद्द्यांवर सरकारने अधिक लक्ष केंद्रित करायला हवे. असं सॅम पित्रोदा यांचं म्हणणं आहे.
तर दुसरीकडे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला.. यांचही बांगलादेशींवर प्रेम उतू चाललय.. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी असून तो बेकायदा घुसला असल्याची माहिती समोर आली होती.. आता त्याने एका भारतीय नागरिकावर जीवघेणा हल्ला केला. पण फारुख अब्दुल्ला यांना त्या बांगलादेशी व्यक्ती बद्दल प्रेमाचे भरते आले.. या हल्लेखोराचा उल्लेख माध्यमांमध्ये बांगलादेशी केला जात असल्याने अब्दुल्ला यांना राग आला.. एका व्यक्तीच्या कृत्याबद्दल संपूर्ण देशाला बदनाम करण्याचे काय कारण असं त्यांचं म्हणणं आहे.. आता यातून त्यांचा कट्टरता वादी सुर स्पष्ट दिसून येतो. त्यावरचा हा खास व्हिडिओ नक्की पहा.