राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकालही जाहीर केला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत राज्यातील दहावी निकालाची संपूर्ण आकडेवारी आणि महत्त्वाचा तपशील जाहीर केला.
तुम्ही दहावीचा निकाल खालील संकेतस्थळांवर पाहू शकता
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
यंदाच्या वर्षी राज्यात दहावीचा एसएससी बोर्डाचा एकूण निकाल ९४.१० टक्के इतका लागला. यंदाही कोकण विभाग निकालात अव्वल ठरला असून, हा निकाल ९८.८२ टक्के इतका लागला. तर, निकालात ९०.७८ टक्क्यांसह नागपूर विभाग सर्वात मागे असल्याचं स्पष्ट झालं.
यंदाच्या दहावी निकालात मुलींनीच बाजी मारली असून, परीक्षेतील उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९६.१४, तर मुलांची ९२.३१ टक्के इतकी आहे. यंदा राज्यात एकूण २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. तर, संपूर्ण राज्यात २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के इतके गुण मिळाले. ४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना ७५ टक्के आणि त्याहून जास्त गुण मिळाले.