बीड पुन्हा हादरले यावेळी संतोष देशमुख पार्ट २

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरल्यानंतर बीड पुन्हा एकदा हादरला आहे. संतोष देशमुख पार्ट टू करू असं म्हणत शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे.

बीडच्या परळी इथल्या शिवराज दिवटे या तरुणाला अपहरण करुन जबर मारहाण करण्यात आली. त्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत काही तरुण शिवराज दिवटेला बेदम चोप देताना दिसत आहेत. शिवराजला जमिनीवर खाली पाडून चारही बाजूंनी मारहाण करण्यात आली. या सगळ्यांच्या हातात काठ्या आणि बांबू दिसत आहेत. यावेळी शिवराज दिवटे जोरजोरात ओरडत होता. मात्र, तरीही मारहाण करणारे त्याला मारत राहिले. या मारहाणीत शिवराज गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मारहाण प्रकरणी परळी पोलिसांनी ७ जणांना अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here