ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं निधन

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले होते.

नारळीकरांनी ११ जून १९६४ रोजी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला होता. अवघ्या २६ व्या वर्षी त्यांनी हा सिद्धान्त मांडला होता. त्यातूनच पुढे विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. नारळीकर हे जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here