वैष्णवी हगवणे यांचं नऊ महिन्यांचं बाळ आज कस्पटे कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहे. बाणेर हायवेजवळ अज्ञाताने बाळ सोपवल्याची माहिती वैष्णवीच्या कुटुंबीयांनी दिली. वैष्णवी हगवणेंच्या मृत्यूनंतर तिच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घरी आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. ते बाळ निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे होते. मात्र, आता अखेर त्या बाळाचा ताबा कस्पटे कुटुंबियांना मिळाला आहे.
वैष्णवीचं बाळ हे ना हगवणे कुटुंबियांकडे होतं, ना कस्पटे कुटुंबियांकडे होतं. ते वैष्णवीच्या नवऱ्याच्या मित्र असलेल्या निलेश चव्हाण यांच्या घरी होतं. त्यानंतर वैष्णवीचे काका बाळाला घेण्यासाठी निलेश चव्हाण यांचं घर गाठलं. परंतु यावेळी दरवाजा बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर काहीवेळेतच कस्पटे कुटुंबियांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला आणि बाणेरच्या हायवेजवळ येऊन तुमचे बाळ घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर वैष्णवीचे काका बाणेरच्या हायवेजवळ गेले आणि त्यांना ९ महिन्यांचे बाळ सुपुर्द केले. आता ही अज्ञात व्यक्ती कोण होती?, याची माहिती घेतली जात आहे.