अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे, त्यामुळे तेथे धोरणात्मक पातळीवर जे काही बदल घडतात, त्याचा प्रभाव जगभर दिसून येतो. डोनाल्ड ट्रम्प देशाचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या निर्णयांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यांनी एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीही कपात केलेली नाही. सलग तीन वेळा दर कमी केल्यानंतर सेंट्रल बँकेने यावेळी कोणताही निर्णय घेतला नाही.
दरात कपात न करण्याच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीवरही दिसून येत आहे. फ्रान्सपासून अमेरिकेपर्यंतच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे. या निर्णयाचा जगातील अब्जाधीशांना मोठा झटका बसला आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, यूएस सेंट्रल बँकेच्या निर्णयानंतर अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली आहे.

फेडच्या या निर्णयानंतर बर्नार्ड अर्नॉल्टला सर्वाधिक नुकसान सोसावे लागले आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सनुसार, त्यांना सर्वाधिक 9.55 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. त्यांची एकूण संपत्ती आता 197 अब्ज डॉलर्स आहे.
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे मित्र आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांचेही नुकसान झाले आहे. यूएस सेंट्रल बँकेच्या निर्णयानंतर अमेरिकेतील दिग्गज उद्योगपती एलन मस्क यांच्या संपत्तीत 7.12 अब्ज डॉलरची घट झाली आहे.