बापानेच आपल्या पोटच्या मुलीचा गळा दाबून हत्या केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. एवढ्यावरच हा नराधम बाप थांबला नाही त्याने मुलीचा मृतदेह पुरला आणि मुलीचा मृत्यू झाल्याच बनाव रचला आहे.
श्रावणी ओगसिद्ध कोठे असं मृत मुलीचं नाव आहे. श्रावणी आपल्या वडिलांसोबत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर गावात राहत होती. आरोपीला तीन मुली आणि एक मुलगा आहे. तर पत्नी सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहे. दोन मुली व मुलगा आजोळी होते.
श्रावणी आपल्या वडिलांसोबतच राहत होती. नराधम बापाने आपले अनैतिक संबंध उघड होवून समाजात बदनामी होऊ ये या विचाराने श्रावणीचा गळा दाबला. आपल्या पोटच्या मुलीला फिट आल्याचे भासवून तिचा मृत्यू झाल्याच बापाने भासवलं.
गळा दाबून श्रावणीचा मृतदेह घरासमोर बांधकामासाठी खणलेल्या खड्याच पुरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल झाला आहे.