फॉर्च्यूनरवर लिहिलेल्या संदेशाची पंचक्रोशीत चर्चा

करमाळ्यामधील एका पठ्ठ्याने फॉर्च्यूनरवर लिहिलेला मजकूर सध्या चर्चेत आला आहे. करमाळा तालुक्यातील अतुल खुपसे यांनी नुकतीच नवीन फॉर्च्यूनर कार खरेदी केली आहे. पण फॉर्च्यूनरमधून उतरल्यानंतर लोकांना संशय येतोय की एवढी महागडी गाडी हुंड्यात तर घेतली नाही ना? लोकांना समजावे म्हणून खुपसे यांनी फॉर्च्यूनरच्या मागच्या बाजूला कारवर एक मजकूरच लिहून घेतला आहे. सध्या या मजकुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

“तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी! मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा, अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय,” असा मजकूर कारच्या मागील बाजूला लिहिलं आहे.

अतुल खुपसे यांच्या नव्या कारवरील हे वाक्य वाचल्यानंतर लोक हसतात. अनेकजण याची चर्चाही करतात. फॉर्च्यूनर सध्या प्रेस्टीज सिम्बॉल म्हणून काही जण वापरत आहेत. पण आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू नये म्हणून खुपसे यांनी लिहिलेल्या संदेशाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here