रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!जनशताब्दी, तेजस एक्सप्रेस दादरपर्यंतच धावणार !

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) मुंबई जनशताब्दी आणि तेजस एक्स्प्रेस सीएसएमटीपर्यंत न धावता दादरपर्यंतच धावणार आहे. प्रवाशांना आणखी महिनाभर दादर स्थानकापर्यंतच प्रवास करता येणार आहे. सीएसएमटीच्या फलाट क्र. १२-१३च्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे काही मेल-एक्स्प्रेस दादर आणि ठाणे स्थानकातच रद्द करण्याच्या निर्णयाला २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य-कोकण रेल्वेने घेतला आहे. यामुळे सीएसएमटी-भायखळ्यातील नागरिकांना मजल-दरमजल करतच प्रवास करावा लागणार आहे.


निधी उपलब्ध झाल्यावर मध्य रेल्वेने हे काम सुरू केले असून सध्या विस्तारीकरण अंतिम टप्यात आहे. विस्तारीकरणाच्या कामांमुळे फलाटाच्या अनुपलब्धतेमुळे काही मेल-एक्स्प्रेस ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर मेल-एक्स्प्रेस पुन्हा सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here