भुशी धरणात बुडून दोघांचा मृत्यू

लोणावळ्याच्या भुशी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात धरणाच्या पाण्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. साहिल शेख आणि मोहम्मद जमाल अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.

वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी हे तरुण या ठिकाणी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येतोय. लोणावळ्याच्या शिवदुर्ग रेस्कयू टीम ने या दोघांचे ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here