ही बातमी वाचून उद्या घराबाहेर पडायचं की नाही ते ठरवाच!

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांनी उद्या म्हणजेच रविवारी 15 जून रोजी बाहेर पडावं की नाही इतकी चिंतेत टाकणारी बातमी आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. तसेच पनवेल ते वाशी अप आणि डाउन मार्गावरही 5 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे.

रविवारी (15 June 2025) सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या काळात मध्य रेल्वे मार्गावरील CSMT ते विद्याविहार दम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या कालावधीत सुटणाऱ्या सर्व डाउन धीम्या लोकल ट्रेन CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत आणि विद्याविहारपासून पुन्हा डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here