बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम’ चा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली असून त्याच्या ओरिजनल चित्रपटाची जास्त चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच अजय देवगणचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की अशानं तर चित्रपटाची पटकथा ही आधीच प्रेक्षकांच्या लक्षात येईल. त्यामुळे प्रेक्षक हिंदी व्हर्जन पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचतील यात शंका आहे. मात्र, या चित्रपटाच्या पटकथेत हा ट्विस्ट आहे. खरंतर, हिंदी आणि मल्याळम व्हर्जनची पटकथा वेगवेगळी असणार आहे. याचा अर्थ दोन्ही चित्रपट हे एकमेकांसाठी स्पॉयलर नसणार आहेत.
चित्रपटाचा पहिला आणि दुसरा भाग हा चांगलाच हिट ठरला. दोन्हीची पटकथा ही ओरिजनल व्हर्जनची रीमेक होती. आता काही दिवसांपूर्वी मोहनलाल आणि अजय देवगण यांन तिसऱ्या भागाची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांमधला उत्साह वाढला आहे. पण आता ही माहिती मिळाल्यानंतर चाहत्यांना हे जाणून घ्यायचं आहे ती कोणत्या चित्रपटाला पाहून जास्त उत्सुकता वाढेल. अजय देवगणनं काही दिवसांपूर्वी घोषणा केली की चित्रपटाचा तिसरा भाग हा ऑक्टोबर 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.