भारत पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा क्रिकेटच्या मैदानात भिडतात तेव्हा या सामन्याकडे जगातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असतं. आगामी आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असणार आहे. ३० सप्टेंबर पासून महिला वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार असून याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५ ऑक्टोबर रोजी सामना होणार आहे. हा सामना श्रीलंकेच्या कोलंबो शहरात होणार असून दुपारी ३ वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये यंदा २८ लीग स्टेज सामने होणार असून त्यानंतर फायनल, सेमी फायनल सह तीन नॉकआउट सामने होणार आहेत. बंगळुरू, इंदोर, गुवाहाटी, विशाखापट्टणम आणि कोलंबोमध्ये हे सामने होतील. दुसरा सेमी फायनल सामना ३० ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये होईल. २ नोव्हेंबर रोजी वर्ल्ड कप फायनल खेळवली जाईल जी बंगळुरू किंवा कोलंबोमध्ये होईल.