रणवीर सिंग ‘डॉन 3’ या ब्लॉकबस्टर फ्रँचायझीमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. १९७८ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’पासून सुरू झालेली ही फ्रँचायझी नंतर शाहरुख खानच्या दोन भागांमधून सुपरहिट ठरली. आता रणवीर सिंगने या आयकॉनिक भूमिका स्वीकारला आहे.
सुरुवातीला कियारा अडवाणी ही रणवीरसोबत मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र, तिच्या प्रेग्नेंसीमुळे आणि प्रसूती रजेमुळे तिला ‘डॉन 3’मधून बाहेर पडावे लागले. त्यामुळे निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रीची शोधाशोध सुरू केली आणि शेवटी त्यांच्या नजरा थांबल्या त्या क्रिती सॅननवर.
चित्रपटातील ‘रोमा’ ही महिला मुख्य भूमिका अत्यंत प्रतिष्ठित मानली जाते. पूर्वी ही भूमिका झीनत अमान आणि नंतर प्रियंका चोप्राने निभावली होती. आता क्रिती सॅननकडे ही व्यक्तिरेखा सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.