वर्धा-हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारधी बेड्यावरील एका घरात दरोडा पडला. अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून 4 लाख 50 हजार रुपये किंमचीचे दागिने चोरून नेले. घरच्यांना चोरीबाबत कळताच त्यांनी लगेचच पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनीही गुन्हा दाखल करुन घेत शोध सुरू केला. मात्र शोध घेत असतानाच पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केली. चौकशीदरम्यानच त्यांना एक संशय आला आणि चोर थेट पोलिसांच्या जाळ्यातच सापडला. चोरला पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमिनच सरकली.
पोलिसांना घरातील सुनेवरच संशय आला. शोभिता चरण भोसले यांची सून नेहा भोसले हिची कसून चौकशी केली असता तिने चोरीची कबूल दिली. तिने चोरी केलेल्या वस्तू घराचे मागे असलेल्या दोनशे मीटर दूर असलेल्या पाटबंधारे विभागाच्या पडीक जागेत एका पन्नीमध्ये जमिनीत हे सगळं सोनं लपवून ठेवले होते. त्यामध्ये 10 हजार रुपये नगदी रोख आणि 4 लाख 55 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत.