पांडुरंगाची इच्छा असेल तर…वाचा अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

पांडुरंगाची इच्छा असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी केलंय. देहूत तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं आहे. यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी तुकोबारायांचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुनेत्रा पवारही वारक-यांसह भक्तीरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांसह फुगडी खेळण्याचा आनंदही त्यांनी घेतला.

अजित पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री होण्याची इच्छा मुंबईत मे महिन्यात झालेल्या एका कार्यक्रमात थेट व्यक्त केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, गेल्या अनेक वर्षांपासून मलाही वाटतं की, मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय. असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रकर्षाने बोलून दाखवली होती. अजित पवार यांनी अनेकदा उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली आहे. पण मुख्यमंत्रीपदापासून अजित पवार अजूनही दूर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here