मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एलिमिनेट करण्यासाठी अघोरी पूजा: संजय राऊत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एलिमिनेट करण्यासाठी अघोरी पूजा केली जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. रोजगार हमी योजनामंत्री भरत गोगावले यांच्या एका व्हिडीओमुळे सध्या खळबळ उडाली आहे. व्हिडीओत भरत गोगावले मांत्रिकासोबत दिसत असून अघोरी पूजा केल्याचा आरोप आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं असून, शिंदेंच्या शिवसेनेकडून वेगवेगळ्या पातळ्यांवर हे सुरु असल्याचा दावा केला आहे.

“शिंदे यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे. गट सर्वत्र..धर्म, सामाजिक, राजकीय क्षेत्रात असतो. त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. ते दिवस रात्र अघोरी विद्येत गुंतलेले असतात. राज्याचे नुकसान कसे होईल आणि आमचा फायदा कसा होईल याकडे पाहत आहेत. ही अंधश्रद्धा जरी असली तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात आपण पुरोगामी म्हणून मिरवतो त्या आमच्या पुरोगामीपणाला डाग लागणारी कृत्यं समोर येत आहेत. अशा लोकांच्या हातात महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू, फुले, आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे,” अशी खंत संजय राऊतांनी बोलून दाखवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here