जान्हवी कपूर लंडनमध्ये तिचा बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवत आहे. तिच्या या युरोपियन ट्रिपमध्ये तिची बहीण आणि अभिनेत्री खुशी कपूर देखील सहभागी झाली आहे. सोशल मीडियावर जान्हवीने काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये जान्हवी त्याच्या प्लेटमधून खाताना दिसते आणि त्यावर त्याची रिअॅक्शन चाहत्यांना फारच मजेशीर वाटली आहे. चाहत्यांनी यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत
जान्हवी आणि शिखरच्या नात्याची अधिकृत चर्चा सर्वप्रथम करण जोहरच्या प्रसिद्ध शो ‘कॉफी विथ करण’ च्या 8व्या सीझनमध्ये झाली होती. करणने जान्हवीला त्यांच्या सततच्या भेटी आणि ब्रेकअपबद्दल विचारले असता, जान्हवीने उत्तर दिलं, ‘तू ते गाणं ऐकलंय का ‘नादान परिंदे घर आजा’? शिखर मला ते गाणं नेहमी म्हणायचा.’ या आधीही जान्हवीला शिखरच्या नावाचा नेकलेस घालून पाहिलं गेलं आहे. दोघं अनेकदा पार्टी, इव्हेंट्स आणि ट्रिप्समध्ये एकत्र दिसले आहेत, ज्यामुळे त्यांचं नातं पुन्हा चर्चेत आलं आहे.
शिखर पहारिया हा भारताचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. त्याची आई स्मृती शिंदे एक अभिनेत्री होत्या. शिखरचा भाऊ वीर पहारियाने नुकताच बॉलिवूडमध्ये ‘स्काय फोर्स’ या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, शिखर जान्हवीसोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये देखील उपस्थित होता. तिथे जान्हवीने तिच्या आगामी ‘होमबाउंड’ चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सहभाग घेतला. हा चित्रपट नीरज घायवान दिग्दर्शित असून, ईशान खट्टर आणि विशाल जेठवा प्रमुख भूमिका साकारत आहेत.