सचिन पिळगावकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट

सचिन पिळगावकर यांनी नुकत्याच एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेले की शोले सिनेमातला गब्बर म्हणजे दिवंगत अभिनेते अमजद खान यांना कितने आदमी थे हा सुपरहिट डायलॉग कसा बोलायचा हे त्यांनी शिकवलेले. मला जितका अनुभव होता तितका त्याला नव्हता त्यामुळे माईकसमोर कसं बोलायचं हे त्याला तेव्हा ठाऊक नव्हतं म्हणून मी तो डायलॉग त्याला शिकवला आणि मग तो नंतर सुपहिट झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर त्यांना हे न पटल्याची पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाड पोस्ट मध्ये म्हणाले, शोले हा सिनेमा १९७५ साली रिलीज झाला. त्यावेळी सिनेरसिकांनी शोले सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला होता. त्यातील एक – एक डायलॉग त्यावेळच्या पिढीच्या तोंडावर होता. डाकू, दरोडेखोर यांच्या भूमिका असलेले अनेक चित्रपट येऊन गेले. मात्र, शोलेमध्ये अमजद खान यांनी साकारलेला गब्बरसिंग जेवढा गाजला, मला नाही वाटत तेवढा कोणता अभिनेता दरोडेखोराच्या भूमिकेमध्ये गाजला असेल. गब्बरसिंग अन् अमजद खान ही हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर नावे आहेत. पण, हे काही मनाला पटले नाही की, गब्बरसिंग म्हणजेच अमजद खान यांना डायलॉग फेकण्याचे कौशल्य- आदब हे त्या सिनेमातील बालकलाकार सचिन पिळगावकर याने शिकवली.

कारण, अमजद खान यांचे वडील झकारिया खान अर्थात जयंत हेदेखील १९५०-६० च्या दशकातील नामांकित अभिनेते होते. म्हणजेच चित्रपटसृष्टीत खानदान असलेल्या अमजद खान यांना सचिन पिळगावकर याने संवादफेक किवा डायलॉग फेकण्याची स्टाईल शिकवावी, हे पचनी पडतच नाही. आज अमजद खान आपल्यात नाहीत आज ही जो कोणी शोले बघेल तो अमजद खान म्हणजेच गब्बर सिंग ला विसरूच शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here