२० जून रोजी आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या या चित्रपटात अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने देखील मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट आधीपासून चर्चेत होता. दरम्यान, या चित्रपटाने पुन्हा एकदा प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाचे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. सुरुवातीच्या आकडेवारी ही दुसऱ्या दिवशी 21.50 कोटी रुपये इतकी आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन दोन दिवस झाले आहेत. अशातच या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 32.20 कोटींची कमाई केली आहे