पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. कोकण कड्याच्या दरीत ४० वर्षाचा तलाठी आणि अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह दरीतून बाहरे काढले. पोलिस अधिक तपास करत आहेत.
आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी आत्महत्या केल्याचे आढळलं आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत असणारे रामचंद्र साहेबराव पारधी (वय वर्षे ४०) आणि जुन्नरच्या आंबोली येथील मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जात आहे.