मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प MUTPअंतर्गंत अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे दरम्यान थेट रेल्वे कनेक्टिव्हीटी, नवीन लोकल कॉरिडॉर, कवच आणि कम्युनिकेशन बेस्ट ट्रेन कंट्रोल (CBTC) सारख्या प्रगत सुरक्षा प्रणाली आणि १५ डब्यांच्या आणि वातानुकूलित गाड्या वाढवणे अशा महत्त्वकांक्षी योजनांचा यात समावेश आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेमधील कवच 5.0, CBTC (कॅब सिग्नलिंग), एसी लोकल ट्रेन, १५-डब्यांच्या लोकल आणि बरेच नवीन योजनांचा समावेश असेल. भारतीय रेल्वे, एमआरव्हीसी, एमएमआरडीए, सिडको आणि मेट्रो यांच्या प्रस्तावित प्रकल्पांचा व चालू प्रकल्पाचा आढावादेखील घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवासाची मागणी, उपनगरीय रेल्वे गाड्यांची सुरक्षितता आणि स्थानकातील मॉडल यावर प्रकल्पाची आरेखन केले जाईल.