अभिनेत्री प्रियांका चोप्रानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खरंतर, प्रियांका चोप्रानं गेल्या काही दिवसांपासून एका बातमीवर प्रतिक्रिया देत सांगितलं की असं वक्तव्य तिनं कधी केलंच नव्हतं. उगाच तिच्या नावावर खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. व्हायरल पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की प्रियांकानं पुरुषांना व्हर्जिन पत्नी शोधू नका असं म्हटलं आहे. तर प्रियांकानं हे वक्तव्य माझं नाही असं म्हटलं आहे.
खरंतर, प्रियांका चोप्राच्या नावानं जी पोस्ट व्हायरल होते, त्यात दावा करण्यात आला आहे की प्रियांकानं म्हटलं की ‘बायको म्हणून व्हर्जिन मुलगी शोधू नका. चांगले संस्कार असलेली मुलगी शोधा. व्हर्जिनीटी ही एका रात्रीत संपते. पण शिष्टाचार हा कायम आपल्यासोबत असतो.’
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टला प्रियांकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केलं आहे. ही पोस्ट शेअर करत तिनं सगळ्यांना सांगितलं की ‘ऑनलाइन जे काही पाहता, त्यावर विश्वास ठेवू नका. ही बातमी फेक असल्याचं म्हणत प्रियांका म्हणाली, ही मी नाही, किंवा मी असं काही बोललेले नाही. फक्त हे ऑनलाइन आहे म्हणून हे सत्य होतं नाही. व्हायरल होण्यासाठी खोटं कॉन्टेट बनवणं अगदी सहज झालं आहे.