शेफाली जरीवालाचं आकस्मिक निधन

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी रात्री आकस्मिक निधन झालं. ‘काँटा लगा’ गाण्यामुळे दोन दशकांपूर्वी घराघरात परिचयाचा झालेला हा चेहरा बिग बॉसच्या १३ व्या पर्वात झळकला होता. शेफालीने वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अंधेरीमधील बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे शेफालीला रात्री उशीरा दाखल करण्यात आलं. मात्र तिला मृत घोषित केलं गेलं. शेफालीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात आहे.

शेफालीला घेऊन तिचा पती अभिनेता पराग त्यागी आणि इतर तीन जण रात्री उशीरा बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आले. शेफालीला मृत घोषित करण्यात आल्यानंतर तिचं पार्थिव पोस्ट मॉर्टमसाठी पाठवण्यात आलं.

शेफालीच्या मृत्यूची बातमी रात्री उशीरा समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावरुन तिचा श्रद्धांजली अर्पण केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here