हृदयविकाराच्या झटक्याने मृत झालेल्या शेफालीला होता हा गंभीर आजार

अभिनेत्री शेफाली जरीवालाने हृदयविकाराच्या झटक्याने जगाचा निरोप घेतला. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर तिच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. तिच्या अकाली जाण्याने चाहत्यांचेही मन सुन्न झाले आहे.

पण खूप कमी लोकांना माहितीये की शेफाली लहान वयापासूनच एका गंभीर आजाराशी लढत होती. त्यामुळे प्रसिद्धी मिळूनही ती फारसे प्रोजेक्ट स्वीकारू शकली नाही. एका मुलाखतीमध्ये तिने स्वतःच याची कबुली दिली होती आणि लोकांना याबद्दल जागरूकही केलं होतं.

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी शेफालीला अपस्माराचा (Epilepsy) पहिला झटका आला. त्या काळात तिला अभ्यासात सर्वोत्तम कामगिरी करायची होती, त्यामुळे तिच्यावर जबरदस्त मानसिक दडपण होतं. याच तणावामुळे आणि चिंतेमुळे तिला हा आजार झाला.ती म्हणाली होती, ‘तणाव, नैराश्य आणि अपस्मार (Epilepsy) हे एकमेकांशी जोडलेले असतात. नैराश्यामुळे अपस्माराचे झटके येऊ शकतात किंवा काही उलटही होऊ शकते.’ अपस्माराचे हे झटके तिला शाळेत, रस्त्यावर चालताना, अगदी कुठेही येत होते. त्यामुळे तिचा आत्मविश्वास खूप ढासळू लागला.

या आजारामुळेच शेफाली फारशा प्रोजेक्ट्समध्ये दिसली नाही. तिने सांगितले होते की, त्या काळात याबद्दल कोणाशी बोलणेही तिच्यासाठी खूप कठीण होते. तरीसुद्धा, कुटुंबाच्या प्रेमळ आधारामुळे आणि स्वतःच्या इच्छाशक्तीने तिने तब्बल १५ वर्षे या आजाराशी झुंज दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here