या भाजीतील किडे डोक्यात जातात आणि गंभीर आजार निर्माण करतात, आजच काळजी घ्या

कोबी खाल्ल्यावर त्यामधील किडे मेंदूत जात असल्याच सांगितलं जातं. धक्कादायक बाब म्हणजे या भाजीमधील किडे शिजवल्यावरही मरत नाहीत. मेंदूत किडे होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत न्यूरोसिस्टीसर्कोसिस म्हटलं जातं.

अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटलं जातं, कोबीच्या भाजीला योग्य पद्धतीने शिजवलं नाही तर त्यामध्ये असलेले टेपवर्म म्हणजे किडे शरीरात शिरकाव करतात. हे किडे शरीरासाठी घातक असतात. असं म्हटलं जातं की, किडा खाण्यासोबत शरीरात शिरकाव करतो. पहिल्यांदा अन्नासोबत किडा पोटात जातो आणि मग तो आतड्यांमधून ब्लड फ्लोसोबत मेंदूमध्ये प्रवेश करतो. त्यामुळे अनेक लोक कोबी खाण्यापासून दूर राहतात. पण या गोष्टीमध्ये किती सत्य आहे याबाबत कुठेच खुलासा झालेला नाही. यावर पहिल्यांदाच डॉक्टरांनी आपलं मत मांडलं आहे. खरंच कोबीमध्ये किडे असतात का? हे किडे जीवघेणे असतात का? काय आहे डॉक्टरांची प्रतिक्रिया.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आतड्यांमध्ये शिरल्यावर शरीरात विशेष बदल पाहायला मिळतात. हे किडे मेंदू, यकृत आणि डोळ्यांमध्ये देखील दिसतात. अशावेळी पोटदुखी, चक्कर, जुलाब, थकवा, उल्टी, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू लागतात.

डॉक्टरांनी सांगितले की कोबी किंवा जंत असलेली कोणतीही भाजी खाण्यापूर्वी ती पूर्णपणे धुवावी. जर असे केले नाही तर या अळ्या तुमच्या आतड्यांमध्ये जाऊ शकतात आणि तेथून तुमच्या मेंदूत जाऊ शकतात, ज्यामुळे सूज येऊ शकते आणि झटके येऊ शकतात. याशिवाय भाज्या पूर्णपणे शिजवल्यानंतर खा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here