उद्धव ठाकरे यांची सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव!

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये नव्याने याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील वादाचा संदर्भ देताना जो आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला तोच आदेश आता सर्वोच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही द्यावा अशी मागणी केली आहे. ही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं पक्ष चिन्ह म्हणजेच ‘धनुष्यबाणा’संदर्भात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भातील वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या धर्तीवर आदेश दिला जावा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे. घड्याळ हे चिन्ह वापरण्याचा मुद्दा न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मराठी वृत्तपत्रांसहीत अन्य वृत्तपत्रांच्या माध्यमातून जाहीर करावं असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर 2023 मध्ये दिला होता. असाच आदेश शिवसेनेचं पक्षचिन्ह असलेल्या धनुष्यबाणासंदर्भातही द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या पक्षाने केली आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने 14 जुलै रोजी या याचिकेवर सुनावणी होईल असं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here