बीड जिल्ह्यातील अनेक वादग्रस्त दाव्यांच्या केंद्रस्थानी असलेले वाल्मिक कराड यांच्यावर त्यांच्या माजी सहकाऱ्याने धक्कादायक आरोप केले आहेत. विजयसिंह (बाळा) बांगर या माजी सहकाऱ्याने पत्रकार परिषद घेऊन कराडविरोधात गंभीर आरोप केले.
विजयसिंह बांगर यांनी आरोप केला की, “संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वीच मला एका सरपंचाच्या हत्येप्रकरणात गोवण्याची धमकी वाल्मिक कराड याने फोनवरून दिली होती. मी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये मतभेद झाले.”
एक अत्यंत भीतीदायक खुलासा करत बांगर यांनी सांगितले की, “महादेव मुंडे यांना ठार मारल्यानंतर, त्यांचे रक्त, हाडं आणि कातडं थेट वाल्मिक कराड यांच्या टेबलावर आणून ठेवण्यात आलं होतं. या घटनेनंतर कराडने मारणाऱ्यांना शाबासकी देऊन कार गिफ्ट केल्या.”