कांदिवलीमध्ये गुजराती टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या १४ वर्षांच्या मुलाला ट्यूशनला जाण्यास सांगितले तेव्हा मुलगा संतापला आणि त्याने ५७ मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कांदिवली पोलिस ADR दाखल करून पुढील तपास करत आहेत.
गुजराती टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री कांदिवली येथील ‘सी ब्रूक’ इमारतीत तिच्या कुटुंबासह राहत होती. बुधवारी तिने तिच्या मुलाला ट्यूशन क्लासला जाण्यास सांगितले होते. परंतु मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिला. यावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. यानंतर अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर उडी मारली. एवड्या उंचीवरून पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. अभिनेत्रीचा तो एकुलता एक मुलगा होता असे सांगितले जात आहे. घटनेनंतर काही वेळाने इमारतीच्या चौकीदाराने तो मुलगा इमारतीवरून खाली पडल्याचे सांगितले. त्यानंतर जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.