मराठीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र आले आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ आहे. अशातच आता ठाकरे बंंधू एकत्र आल्यानंतर आरएसएस ने दिलेली पहिली प्रतिक्रिया भाजपला झटका देणारी आहे. मराठी भाषेच्या प्रश्नावर आरएसएस ने जाहीर भूमिका मांडली आहे.
“संघाचं नेहमीचं मत आहे की भारतातील सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या राज्यातील स्थानिक भाषेतच शिक्षण घ्यावं, असं आम्ही नेहमी सांगतो. आपल्या आपल्या राज्यात लोक स्थानिक भाषेत बोलतात, आणि त्यात शिक्षण घेणं हेच योग्य. हे मत संघाने पहिल्यापासून मांडलेलं आहे, आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहोत. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाषेवरून वाद निर्माण होतोय, पण आमचं मत स्पष्ट आहे – सगळ्या भाषा राष्ट्रीय आहेत आणि स्थानिक भाषेला प्राधान्य मिळालंच पाहिजे अशी प्रतिक्रिया प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.