दाक्षिणात्य सिनेविश्वातील एक गाजलेलं नाव अभिनेता विष्णू विशाल यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान आपल्या ‘लाल सलाम’ या चित्रपटाला मिळालेल्या अपयशासंदर्भातील वक्तव्य केलं. हा चित्रपट सपशेल आपटला याचं कथा त्यांनी रजनीकांत असल्याचं म्हटलं.
ते म्हणाले, सुरुवातीला या चित्रपटात आपण मध्यवर्ती कलाकार होतो आणि रजनीकांत (Rajinikanth) यांची त्यात पाहुणे कलाकारांची भूमिका होती. मात्र नंतर रजनीकांत यांची भूमिका वाढवण्यात आली ज्यामुळं चित्रपटातील आपली भूमिका कमी झाल्याचा दावा विष्णू विशालनं केला.विष्णू विशालच्या माहितीनुसार चित्रपटात शेवटच्या क्षणी झालेल्या या बदलांमुळंच तो बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. सुरुवातीला प्रेक्षक रजनीकांत यांच्या भूमिकेला दणदणून प्रतिसाद देतील असं आम्हा सर्वांनाच वाटलं मात्र दुर्दैवानं तेच चित्रपटाच्या अपयशाचं कारण ठरलं असं स्पष्ट वक्तव्य विष्णू विशालनं केलं.