अंतराळातील प्रत्येक लहानमोठ्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्या अमेरिकी अंतराशळ संशोधन संस्था नासानं आणखी एक मोठी जबाबदारी खांद्यावर घेतली असून, ही जबाबदारी पृथ्वीवरील १० टक्के लोकसंख्येचा जीव वाचवण्याची. पृथ्वीवर एक असं संकट घोंगावत आहे, ज्या कारणानं १० टक्के लोकसंख्या धोक्याच्या गर्त छायेत असल्याचं सांगण्यात येत आहे. याच धर्तीवर नासानं एक मोठी यंत्रणा कामाला लावली आहे.
पृथ्वीवरील जिवंत ज्वालामुखीचे स्फोटच आणि त्यांची ओळख करून त्यांचा उद्रेक होण्याआधीच नासानं अवकाशातून त्या अचूक ठिकाणांवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळं वातावरणात होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांची माहितीसुद्धा मिळू शकणार असून, ज्वालामुखीच्या उद्रेकापूर्वी कोट्यवधी नागरिकांना सावध करत त्याना सुरक्षित स्थळी पोहोचवले जाणार आहे.
नासा विविध उपग्रह आणि उपकरणांच्या मदतीनं सक्रिय ज्वालामुखींवर सध्या लक्ष ठेवून आहे. यामध्ये Landsat 8 आणि 9 चासुद्धा समावेश आहे. या उपग्रहांच्या माध्यमातून हाय रेझोल्यूशन फोटो टीपत त्या माध्यमातून ज्वालामुखीच्या अंतर्गत भागात सुरू असणाऱ्या हालचालींचा आढावा स्पष्टपणे दिसू शकणार आहे. याशिवाय वैज्ञानिक Sentinel-5P च्या मदतीनं वातावरणातील सल्फर डायऑक्साईडसारख्या वायूस्तरांचीसुद्धा पातळी लक्षात घेण्यास मदत होणार आहे.
सध्या नासाला GOES-R Series च्या माध्यमातून Real Time ढगांची स्थिती आणि त्यांच्या दाटीसंदर्भातील माहिती आणि फोटो मिळत आहेत. नासाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ज्वालामुखीच्या उद्रेकाची माहिती देण्यासाठी तसंतर Early Warning System सज्ज आहे मात्र, तरीही नासा अद्ययावत तंत्रांचा वापर करण्यावर अधिक भर देत आहे.