जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचं वृत्त म्हणजे खोडसाळपणा!: जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या, तब्बल सात वर्षे मी या पदावर काम केले. आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो, अशी भावनिक सादही पाटील यांनी घातली होती. त्यानंतर, आता जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवारांकडे दिला असून 15 जुलै रोजी नवीन प्रदेशाध्यक्ष ठरला जाईल, नव्या नावाची घोषणा होईल, असे समजते. मात्र, जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे पक्षाचे राष्ट्राय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे, राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला आहे.

जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाबाबत अजून नाव निश्चित नाही, पवार साहेब, सुप्रिया ताई, जयंत पाटील आणि पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. 15 तारखेला पक्षाची बैठक आहे, काही नावं चर्चेत आहेत, माझंही नाव चर्चेत आहेत. ज्यावेळेला निर्णय होईल, निवड होईल त्यावेळी निश्चितपणानं काम करू, असं शशिकांत शिंदे म्हणाले. मात्र, जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे वृत्त आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फेटाळलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here