पवन कल्याण यांच्यावर प्रकाश राज यांची टीका

तेलुगू चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची फिल्म ‘हरि हरा वीरा मल्लू’ 24 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत आहेत. ही पॅन इंडिया फिल्म अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती. पवन कल्याण सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून, त्याचबरोबर सरकारी कामांमध्येही ते सहभागी नोंदवत आहेत. या दरम्यान त्यांनी हिंदी भाषा वादावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी दक्षिण भारतीयांना हिंदी शिकण्याचे महत्त्व समजावून सांगितले. मात्र, अभिनेते प्रकाश राज यांना पवन यांचे हे वक्तव्य खटकले. त्यांनी पवन कल्याण यांचे हे भाष्य लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.

प्रकाश राज यांनी पवन कल्याण यांचा एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ते लोकांना हिंदी बोलण्याचे महत्त्व सांगत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत प्रकाश राज यांनी लिहिले, “कशाच्या मोबदल्यात स्वतःला विकलं? किती लाजिरवाणं! #JustAsking.” प्रकाश राज यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आणि त्यांच्यावर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here