रितेश देशमुख हा त्याच्या आगामी चित्रपट ‘मस्ती 4’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरु असतानाच दोघांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ती म्हणजे ‘मस्ती 4’ या चित्रपटात अभिनेत्री जिनिलीया देशमुख देखील झळकणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. रिपोर्टनुसार, दोघेही या चित्रपटात एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. दोघांची जोडी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. बॉलिवूडची लोकप्रिय जोडी म्हणून त्यांना ओळखलं जात. रितेश-जिनिलीयाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अनेकदा दोघे एकत्र चित्रपटांमध्ये दिसतात. त्या दोघांना चित्रपटात एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक असतात. दोघांचाही मोठा चाहता वर्ग आहे. अशातच ते पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत.