उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची विधानसभेतील ऑफर नंतर भेट! नेमकं पडद्याआड काय घडतंय?

“आम्हाला 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही. मात्र, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप नक्कीच आहे,” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट सभागृहातच ऑफर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. यातच आज उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान या भेटीत तब्बल 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामध्ये, विधानसभा विरोधी पक्षनेते पद, त्रिभाषा सूत्र आणि हिंदीसक्ती संदर्भात उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चा झाली. यावेळी हिंदीची सक्ती हवीच कशाला? हे पुस्तक उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना भेट दिले. तसेच, हेच पुस्तक नव्याने नेमण्यात आलेल्या समिती अध्यक्ष नरेंद्र जाधव यांना आपण द्यावे,  असं देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना म्हटलं. तर, विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. मात्र, हे विरोधी पक्षनेतेपद अजूनही दिलं जात नाहीये, त्या संदर्भाने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री यांच्यासोबत अँटी चेंबरमध्ये चर्चा केल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे काही आमदार देखील उपस्थित होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here