सलमान खानने मुंबईमधील त्याचे वांद्रे येथील अलिशान घर कोट्यवधी रुपयांना विकल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानचे हे अपार्टमेंट वांद्रे पश्चिमेच्या पाली हिल या परिसरात शिव अस्थान हाईट्स येथे असल्याची माहिती आहे. काही रिपोर्ट्सनुसार सलमान खानने त्याचे हे अपार्टमेंट 5.35 कोटी रुपयांना विकलं आहे. या अपार्टमेंटमध्ये 122.45 चौरस मीटर जागेसह तीन कार पार्किंगसाठी जागा होती.
सलमान खानच्या या अपार्टमेंटच्या विक्रीसाठी स्टॅम्प ड्युटी 32.01 लाख रुपये इतकी होती. तर नोंदणी शुल्क 30 हजार रुपये इतके होते. 5.35 कोटी रुपयांना हे घर विकून सलमान खानने मोठी कमाई केली आहे. सलमान खान सध्या त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट येथे राहते. तो त्याठिकाणी कुटुंबासह राहतो. अनेक ठिकाणी सलमान खानचे फार्म हाऊस देखील आहेत. ज्यामध्ये पनवेल, लोणावळा या ठिकाणी सलमान खान सुट्टीमध्ये जात असतो.